शरद पवारांनी भीमा-पाटस कारखाण्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा संभ्रम : निळकंठ शितोळे

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवारांनी भीमा-पाटस कारखाण्याबाबत केलेल्या विधानामुळे दौंड तालुक्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून पवारांचे हे विधान नेमके कुणासाठी आहे असा प्रश्न कात्रज दूध संघाचे माजी संचालक निळकंठ शितोळे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत शितोळे यांनी बोलताना ‛दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाण्याची अवस्था ही प्राण वायुवरील रुग्णासारखी असून’ कारखान्यावर असणाऱ्या ११२ कोटी रुपये कर्जाला कै.सुभाषअण्णा कुल हे जबाबदार नसून ज्यांच्या हातामध्ये या कारखाण्याचा सर्व कारभार सुपूर्द केला तेच याला जबाबदार आहेत अशी टिका २००२ साली मा. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भीमा पाटस कारखाण्याच्या तेविसाव्या गळीत हंगामाच्या वेळेस केली होती याची आठवण करून देत परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरवंड येथील सभेत त्यांनी भीमा पाटस कारखाण्यावर बोलताना भीमा पाटस कारखाण्याची अवस्था पाहून झोप येत नाही असे सांगून कारखाण्याचे चेअरमन राहुल कुल यांच्यावर टिका केली होती.

मात्र २००२ साली भीमा-पाटस कारखाण्यावर त्यावेळी करण्यात आलेले पवार साहेबांचे विधान खरे मानायचे की परवा त्यांनी जे वरवंड येथील सभेत विधान केले होते ते खरे मानायचे याबाबत तालुक्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असल्याचे सांगत भीमा-पाटस कारखाण्यावर झालेल्या कर्जाच्या डोंगराबाबत शरद पवार साहेबांनी आपली भूमिका मांडताना त्यावेळी कुल नव्हे ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने कारखाण्याची सूत्रे होती त्यांना जबाबदार धरले होते.

पण ज्यांना या गोष्टीला जबाबदार धरले होते तेच आता पवार साहेबांना यांना उमेदवार म्हणून कसे चालतात असा प्रश्न उपस्थित होत असून कारखाण्याचे वाटोळे करणाऱ्यांना पाडा असे आवाहन पवारांनी केले आहे. परंतु कारखाण्याचे वाटोळे कुणी केले हे मागील दहा वर्षांपूर्वी पवार साहेबांनी वेळोवेळी आपल्या भाषणांमध्ये जाहीर केले होते. त्यामुळे ते आपल्याच उमेदवाराला पाडा असे तर म्हणत नसावेत ना असा त्याचा अर्थ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी भीमा-पाटस कारखाण्याबाबत बोलताना भीमा पाटस कारखाण्याची परिस्थिती २००२ नंतर सुधारून राहुल कुल यांनी कोजेन, डिस्टलरी हे प्रकल्प सुरू केले आहेत.आत्ताची कारखाण्याची अवस्था ऊस कमी असल्यामुळे अडचणीची असली तरी ऊस कमी करण्याला पवारच जबाबदार आहेत कारण त्यांनी दौंडमध्ये खाजगी कारखाने काढून सहकारी कारखाना संकटात आणण्याचे काम केले आहे असे शेवटी त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी