Sharad Ponkshe On PM Modi | ‘पंतप्रधान मोदी स्वत:ला गांधीवादी म्हणत असले, तरी ते मूळ सावरकर…’ – शरद पोक्षे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Ponkshe On PM Modi | स्वातंत्र्यानंतर सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची (Congress) ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणार नाही, असे मत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी व्यक्त केले. शरद पोंक्षे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर जयंती समितीतर्फे ‘स्वतंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. (Sharad Ponkshe On PM Modi)

 

यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale), अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde), विवेक जोशी (Vivek Joshi), प्रकाशक पार्थ बावस्कर (Partha Bavaskar), समितीचे सूर्यकांत पाठक (Suryakant Pathak), विद्याधर नारगोळकर (Vidyadhar Nargolkar), विश्वनाथ भालेकर (Vishwanath Bhalekar), मकरंद माणकीकर (Makrand Mankikar), श्रीकांत जोशी (Shrikant Joshi) आदी उपस्थित होते. शब्दांमृत प्रकाशतर्फे शरद पोंक्षे यांचाय ‘दुसरं वादळ’ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले. (Sharad Ponkshe On PM Modi)

 

शरद पोंक्षे म्हणाले, सावरकरांना टिळकांची काँग्रेस मान्य होती. गांधीची नव्हती. हिंदी राष्ट्रवाद, मुस्लिमांचे पराकोटीचे लांगुलचालन यामुळे मी काँग्रेसमध्ये कधीच येऊ शकत नाही, हे सावरकरांनी स्पष्ट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वत:ला गांधीवादी म्हणत असले, तरी ते मूळ सावरकरवादी आहेत. राजकीयदृष्ट्या योग्य भूमिका स्वीकारणे यांना जमते. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी पंतप्रधानपदी असताना त्यांनी सावरकरांचा गौरव केला होता. हा इतिहास इंदिरा गांधींच्या नातवाला माहिती नाही.

पोंक्षे म्हणाले, अंदमानातून सुटल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजसुधारक म्हणून मोठे कार्य उभारले.
त्यांनी सर्व जातीमधील मुलांच्या मुंजी लावल्या. आंतरजातीय विवाह घडवून आणले. सहभोजने घातली.
मंदिरे खुली केली. सावरकरांच्या विरोधकांवर जातीद्वेष, जातीभेदाचे संस्कार होते.
आमच्यावर सावरकरांचे संस्कार आहे. राम जिंकणार, रावण हरणार, यावर माझा ठाम विश्वास आहे.

 

Web Title :- Sharad Ponkshe On PM Modi | prime minister narendra modi calls himself gandhian but he is originally savarkar said sharad ponkshe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mutual Fund Calculator | ‘या’ फंडने रू. 10,000 च्या मंथली SIP चे बनवले 17.58 लाख रुपये, गुंतवणुकदार झाले मालामाल

 

Ajit Pawar On Gyanvapi | ज्ञानवापीवरुन अजित पवारांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘तीनशे-चारशे वर्षापूर्वीचे आता कशाला काढता

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर, ‘या’ तारखेपासून 27,000 रुपये वाढू शकते तुमची सॅलरी!