Sharad Ponkshe On Raj Thackeray | ‘राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणार’ – शरद पोंक्षे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Ponkshe On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी ठाण्यातील (Thane) उत्तरसभेच्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली (MNS Uttar Sabha). राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांवरून इशारा दिला आहे. 3 मेपर्यंत सर्व भोंगे उतरवले पाहिजेत असं म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांच्या भाषणावर काही संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनीही राज ठाकरे यांच्या भाषणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Ponkshe On Raj Thackeray)

शरद पोंक्षे सोशल मीडियावर सक्रीय असलेले पाहायला मिळतात. दिलखुलासपणे ते सोशल माध्यमांवर आपलं मत मांडत असतात. अशातच त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर एक पोस्ट केली आहे. आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) आठवण करून देणारं. बऱ्याच काळान धारदार भाषण, हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यवाद राजसाहेब, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. (Sharad Ponkshe On Raj Thackeray)

शरद पोंक्षे यांची ही पोस्ट व्हायरल (Viral Post) झालेली पाहायला मिळत आहे. त्यांच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये मशिदीवरील भोंगे आणि राष्ट्रवादीच्या (NCP) प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका केली.

भोंग्यांबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

तुम्ही दिवसभरात 5-5 वेळा नमाज पढता, बांग देता. एकतर सगळे बेसूर असता. काय म्हणून आम्ही ऐकायचं ? रस्त्यावर घाण झाली तर आपण रस्ता साफ करतो. फुटपाथवर घाण झाली तर फुटपाथ साफ करतो, मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना कार्यकर्त्यांनी तलवार दिली होती. सभेदरम्यान राज ठाकरेंनी तलवार दाखवली.
तलवार दाखवल्यामुळे त्यांच्यावर नौपाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title : Sharad Ponkshe On Raj Thackeray | marathi actor sharad ponkshe comment on raj thackeray thane speech

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा