पुलवामा येथील शहिद जवानांना रांगोळी रेखाटून मेणबत्ती पेटवून श्रध्दाजंली अर्पण केली

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पुलवामा येथील आत्मघातकी हल्ल्यात देशातील वीर 44 जवान शहिद झाले. यानंतर पाकिस्तान विषयी देशातील नागरीकांन मध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली.पाकिस्तानातील अतिरेकी कारवाई बाबत भारताने ठोस निर्यण घेत कारवाई करावी अशी मागणी होत आहे. देशासाठी बलीदान दिलेल्या जवानांना देशात विविध भागातून श्रध्दाजंली अर्पण करण्यासाठी मशाल रँली, शोक सभा, मेणबत्ती पेटवून श्रध्दाजंली अर्पण केली जात आहे.

आज रविवारी सांयकाळी मोगलाई परिसरातील महिलांनी एकञ येऊन शहिद जवानांना श्रध्दाजंली देण्यासाठी तीन तासांत वीर जवान तुझे सलाम शहिद स्तंभाचे रांगोळी रेखाटत त्या मेणबत्ती तेवत ठेऊन वीर जवांना तुझे सलाम, वीर जवान अमर रहे घोषणा देत मोगलाई परिसरातून दोन दोनच्या रांगेत हातत पेणत्या मेणबत्ता घेत संतोषी माता चौकातील शहिद अब्दूल हमिद स्मारका पर्यत आल्यावर शहिद स्मारका जवळ मेणबत्या लावून श्रध्दाजंली अर्पण केली

यावेळी उपस्थित मोगालाई महिला मंडळातील नगरसेविका किरण कुलेवार, स्वाती आगलावे ,मनिषा वाल्हे ,शितल काळे , कल्याणी कोळी ,रोहीणी पवार, छायाताई चहाकर, भारती शितोळे, सुवर्णा काळे. जयश्री चहाकर, निता सुर्यवंशी ,पल्लवी सपकाळ.आदी सहभागी झाल्या होत्या.