Navratri 2020 : नवरात्रीत प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व, जाणून घ्या कोणत्या दिवशी होईल आईची कोणत्या रूपात पूजा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   शनिवारी 17 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. या नऊ दिवसात आई दुर्गाची भक्तिभावाने पूजा केली जाईल. देशाच्या विविध भागात नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. खासकरुन गुजरात आणि बंगालमध्ये नवरात्रीचे एक वेगळेच आकर्षण असते.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व

नवरात्रीचा प्रत्येक दिवस मां दुर्गेला समर्पित असतो. नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवसाला महानवमी म्हणतात आणि या दिवशी कन्या पूजन केले जाते. जाणून घेऊया नवरात्रीच्या कोणत्या दिवशी आईच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाईल.

आईची नऊ रूपं दिवस तारीख आईचे स्वरूप

नवरात्र दिवस 1 – प्रतिपदा 17 ऑक्टोबर (शनिवार) आई शैलपुत्री (घाट-स्थापना)
नवरात्र दिवस 2–द्वितीय 18 ऑक्टोबर (रविवार) आई ब्रह्मचारिणी
नवरात्र दिवस 3 – तृतीया 19 ऑक्टोबर (सोमवार) आई चंद्रघंटा
नवरात्र दिवस 4– चतुर्थी 20 ऑक्टोबर (मंगळवार) आई कुष्मांडा
नवरात्र दिवस 5– पंचमी 21 ऑक्टोबर (बुधवार) आई स्कंदमाता
नवरात्र दिवस 6 – षष्ठी 22 ऑक्टोबर (गुरुवार) आई कात्यायनी
नवरात्र दिवस 7 – सप्तमी 23 ऑक्टोबर (शुक्रवार) आई कालरात्रि
नवरात्र दिवस 8 – अष्टमी 24 ऑक्टोबर (शनिवार) आई महागौरी (महा अष्टमी, महा नवमी पूजा)
नवरात्र दिवस 9 – नवमी 25 ऑक्टोबर (रविवार) आई सिद्धिदात्री
नवरात्र दिवस 10 – दशमी 26 ऑक्टोबर (सोमवार) दुर्गा विसर्जन (दसरा)