OUT डोअर सराव करणारा ‘शार्दुल’ ठरला भारताचा पहिला क्रिकेटपटू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोनामुळे दोन महिन्यांपासून क्रिकेट स्पर्धा बंद करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने देशातील मैदाने क्वारंटाईन सेंटर करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे खेळाडूचा आउटडोअर सराव थांबला आहे. मात्रा, सोशल डिसटन्ससह सर्व नियमांचे पालन करत सराव सुरु करणारा शार्दुल ठाकूर हा भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. पालघर येखील घराजवळील मैदानावर शार्दुलने सराव सुरु केला आहे.

शार्दुल ठाकूर स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधीत्व करतो. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला भारतीय संघाच संधी देण्यात आली होती. त्यामध्ये त्याने आतापर्यंत चांगला फायदा उचलला आहे. शार्दुलने आतापर्यंत 11 वन-डे, 15 टी-20 आणि एका कसोटी सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केले आहे. तर पहिलाच कसोटी सामना खेळणार्‍या शार्दुलला दुखापतीमुळे गोलंदाजीची फारशी संधी मिळाली नव्हती. शार्दुलसोबत सराव करण्यासाठी काही स्थानिक खेळाडूही सहभागी झाले होते. त्यामध्ये मुंबई रणजी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेचाही समावेश होता. दोन महिन्यानंतर आम्ही सराव केला आहे, खूप बरे वाटत आहे अशी प्रतिक्रीया शार्दुलने दिली आहे. दरम्यान सरावाआधी सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आल्याचे पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. खेळाडूंनी सरावासाठी स्वतःचा चेंडू व साहित्य आणले होते. जे आम्ही सॅनिटाईज करुन घेतले. तसेच सरावासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडूचे थर्मल स्क्रिनींगही करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.