चौथ्या कसोटीत मुंबईकर असलेल्या शार्दुलला संधी मिळण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला १५ जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, सिडनी येथे झालेल्या रोमांचक कसोटी सामन्यात (Teat Match) पहिल्या डावात फलंदाजी करत असताना झालेल्या दुखापतीमुळे रविंद्र जडेजाला भारतीय संघातून आपलं स्थान गमवावं लागलं आहे. त्यामुळे जडेजा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याने चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन मुंबईकर शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्याचा विचार करत असल्याचं वृत्त आहे.

शार्दुलने याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र याच सामन्यात त्याला दुखापतीमुळे गोलंदाजी करता आली नाही. त्याच्या दृष्टीकोनातून तो प्रसंग थोडा दुर्दैवी होता. त्यामुळे त्याला जाडेजाऐवजी संघात जागा मिळू शकते. कारण शार्दुल वेळप्रसंगी फलंदाजीही करु शकतो. त्यामुळेच त्याचं पारडं जड मानलं जात आहे. मात्र, संघ व्यवस्थापन ब्रिस्बेन येथे दोन फिरकी गोलंदाजानिशी मैदानात उतरणार असल्याच कुलदीप यादवला संधी मिळू शकते. याबाबतचा अंतिम निर्णय प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि कर्णधार अजिंक्य रहाणे घेणार असल्याचं कळतंय.