शेअर बाजारात ‘तेजी’, 1.26 लाख कोटींचा फायदा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या शेवटी शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. सेंसेक्स निफ्टीमध्ये वाढ होऊन ६०० अंकांवर स्थिरावले. BSE चे मुख्य इंडेक्स सेंसेक्स २२८ अंकांनी वाढून ३६,७०१ अंकांनी वाढला. तर एनएसई या ५० शेअर प्रमुख इंडेक्सन निफ्टी ८८ अंकाने वाढून १०,८२९ वर जाऊन स्थिरावला. यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला फायदा मिळेल.

देशातील अर्थव्यवस्थेला मदत निधी मिळण्याच्या अपेक्षेतून अनेक गुंतवणूकादारांनी मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केली. BSE वरील लिस्टेड कंपन्यांची किंमत १.२६ लाख कोटी रुपयांनी वाढली.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरावण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात सर्वात मोठी घोषणा म्हणजे सरकारने बँकांना ७० हजार कोटींची तरतूद केली आहे. यामुळे बँका आता ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कर्ज घेतील. परंतू या निर्णयाआधीच शेअर बाजार चांगलेच वधारले.

आरोग्यविषयक वृत्त –