Share Market | घसरणार्‍या बाजारात पैसे कमावण्याची चांगली संधी, सध्या खरेदी करू शकता ‘या’ 7 कंपन्यांचे शेअर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेअर बाजार (Share Market) गेल्या 7 महिन्यांपासून दबावाखाली आहे. ऑक्टोबर – 2021 मध्ये सेन्सेक्सने सर्वकालीन उच्चांक (All Time High) गाठला होता. तेव्हापासून बाजारात घसरण सुरूच आहे. (Share Market)

 

वास्तविक, ऑक्टोबर – 2021 मध्ये सेन्सेक्स (Sensex) 62000 च्या वर गेला होता. तर निफ्टी 18600 वर पोहोचला. मात्र त्यानंतर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे.

 

सध्या सेन्सेक्स 54000 च्या आसपास व्यवहार करत आहे. अशाप्रकारे सेन्सेक्स आतापर्यंतच्या उच्चांकावरून सुमारे 8000 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टी 16000 च्या आसपास आहे. जो सर्वोच्च पातळीपेक्षा सुमारे 2500 अंकांनी खाली आहे.

 

शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार अस्वस्थ
अशा स्थितीत सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी आहे का ? कारण काही फंडामेंटली मजबूत कंपन्यांचे शेअर्सही घसरले आहेत, जे आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. (Share Market)

सीएनआय रिसर्चचे CMD किशोर ओस्तवाल म्हणतात की, जर गुंतवणुकीचा दृष्टीकोन लाँग टर्म असेल, तर तुम्ही यावेळी काही शेअर्समध्ये थोडी – थोडी गुंतवणूक करू शकता.

ते म्हणाले की, बाजारात नेहमीच घसरण होत नाही. घसरणीच्या वेळी गुंतवणुकीसाठी चांगली संधी देखील असते. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही या 7 शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता. कारण गेल्या 7 महिन्यांपासून बाजार एका वर्तुळात फिरत आहे. तज्ञांनी शिफारस केलेले शेअर्स पुढील प्रमाणे –

– Infosys :
आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे. सध्या या शेअरचे मूल्य 1446 रुपये आहे आणि त्याचा सर्वकालीन उच्चांक 1953 रुपये आहे. जिथून शेअर जवळपास 25 टक्क्यांनी खाली आला आहे.

 

– Tata Motors :
वाहन क्षेत्रातील मोठी कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे सांगितले जात आहे.
24 मे रोजी टाटा मोटर्सचे शेअर्स 418 रुपयांना मिळत आहेत. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 536 रुपये आहे.

 

– Tata power :
किशोर ओस्तवाल यांनी टाटा पॉवरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये मोठा व्यवसाय आहे.
या शेअरची सध्याची किंमत 228 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा उच्चांक 298 रुपये आहे.

– Bhel :
सरकारी कंपनी Bharat Heavy Electricals Limited (BHEL) चा शेअर सध्या 50 रुपये आहे,
ज्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 80 रुपये आहे, म्हणजेच शेअर 30 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

 

– Vedanta :
वेदांताचा शेअर सध्या 308 रुपयांना मिळत आहे आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.
या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 440 रुपये आहे.

 

– Vipul Organics आणि Windsor Machines
याशिवाय विपुल ऑरगॅनिक्स आणि विंडसर मशिन्समध्ये गुंतवणुकीच्या संधी असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
मात्र, एकाच वेळी कोणत्याही स्टॉकमध्ये मोठी रक्कम गुंतवू नका.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Share Market | investing in uncertain times share market expert suggests these 7 stocks for long term

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा