इराण-अमेरिकेमधील तणावामुळं शेअर बाजारात प्रचंड ‘खळबळ’ ! मुकेश अंबानींना 9333 कोटींचा ‘फटका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि इराणच्या तणावामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून आला. यामुळे बीएसी स्टोक सेंसेक्समध्ये 788 आकड्यांची घसरण पहायला मिळाली. यामध्ये सर्वसामान्यांना तर नुकसान झालेच आहे शिवाय रिलायंस इंडस्ट्रीज (RIL) चे चेअरमन मुकेश अंबानी यांना देखील 9,333 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

राकेश झुनझुनवाला यांना देखील मोठे नुकसान
अंबानी यांच्याव्यतिरिक्त राकेश झुनझुनवाला याना देखील सोमवारी केवळ एका दिवसामध्ये 136 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये गेल्या चार महिन्यातील निच्चांकी पहायला मिळाला. निफ्टी देखील 12 हजारांपेक्षा खाली गेल्याचे पाहायला मिळाले. बाजार बंद होण्याच्या वेळी सेंसेक्स 787.98 अंकांनी म्हणजेच 1.90 % नी घसरून 40,676.63 वर बंद झाला.

यामुळे भारतातील अनेक दिग्गज उद्योगपती आणि व्यावसायिकांच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये प्रचंड घट झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 2.2 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 9,333 कोटी रुपये घट झाली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाला यांच्या संपत्तीमध्ये देखील 136 कोटी रुपयांची घट झाली आहे.

काय आहे आंतराष्ट्रीय तणाव
अमेरिकेने इराणचे जनरल सुलेमानी यांच्यावर हल्ला केला त्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये मोठ्या तणावाला सुरुवात झाली होती. याचा परिणाम इतर देशांवर देखील पाहायला मिळाला. कच्च्या तेलाच्या किमितींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आहे एवढेच नाही तर सोन्याचा दर देखील वाढले आहेत. सोमवारी झालेल्या शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना एकूण 2.97 लाख कोटींचा फटका बसला आहे. तसेच यावेळी आशियातील सर्व प्रमुख बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/