Coronavirus Impact : मोठया घसरणीसह बंद झाला शेअर बाजार, सेंसेक्स 1375 अकांनी कोसळला तर निफ्टी 8300 च्या खाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळले. मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्स असलेला निर्देशांक 1375 (4.61%) अंकांनी घसरून 28,440.32 वर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी 379.15 अंकांनी (4.38%)घसरून 8,281.10 वर बंद झाला. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 12 शेअर ग्रीन मार्क व 38 शेअर लाल चिन्हाने बंद झाले. आज दिवसाच्या व्यापारात सेन्सेक्स 29,497.57 अंकांच्या उच्चांकावर गेला, पुन्हा एकदा तो 28,290.99 अंकांच्या नीचांकावर आला.

शेअर्समध्ये बजाज फायनान्सची सर्वाधिक घसरण झाली. त्यात सुमारे 12 टक्के घसरण झाली. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि मारुती यांचा क्रमांक लागतो. तर नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, एचयूएल आणि अ‍ॅक्सिस बँक या कंपन्यांनी सर्वाधिक कमाई केली.

विविध रेटिंग एजन्सीजमुळे देशाच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी झाल्यामुळे दुपारची विक्री जोरात सुरू झाली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआयने धोरणात्मक दरामध्ये मोठी कपात करण्यासह अन्य पावले उचलली आहेत तेव्हाची ही परिस्थिती आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये खाजगी खपातील घट आणि गुंतवणूकीतील घट लक्षात घेता फिच सोल्यूशन्सने पुढील आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 4.6 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशीच शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी मुंबई स्टॉक एक्सचेंजचे ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स 882.31 (2.96%) अंकांच्या घसरणीसह 28,933.28 आणि नॅशनल स्टॉक एक्सेंज चा निर्देशांक निफ्टी 284.65 (3.29%)अंकांच्या घसरणीसह 8,375.60 वर खुला झाला. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपाया ३२ पैशांनी घसरून 75.21 वर आला. मागील व्यापार दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपया 74.85 वर बंद झाला होता.