शेअर बाजार पुन्हा कोसळला ! सेन्सेक्स 1 हजार 591 अंकांनी ‘कोसळला’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोना व्हायरसचा परिणाम अजूनही शेअर बाजारवर पाहायला मिळत आहे. आज सकाळी शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स तब्बल 1 हजार 591 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे शेअर बाजारावर आजही करोनाचा परिणाम पहायला मिळाला आहे.

शेअर बाजारावर आजही करोनाचा परिणाम पहायला मिळाला असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार खुला झाला. त्यानंतर मोठ्या पडझडीनेच बाजाराला सुरुवात झाली. सेन्सेक्स 1 हजार 591.80 अंकांनी कोसळून 32 हजार 511.68 अंकांवर उघडला. तर निफ्टी 446.85 अंकांनी कोसळून 9 हजार 508.35 अंकावर उघडली आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा आर्थिंक फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपुर्वी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात घट झाली होती. त्यानंतर आज पुन्हा शेअर बाजर तब्बल दीड हजारांनी घसरल्याने सोन्या-चांदीच्या दरात घसरण होण्याची शक्यता जाणकरांनी वर्तविली आहे.