शेअर बाजारात ‘हाहाकार’, सेंसेक्समध्ये इतिहासातील सर्वात मोठी ‘घसरण’, 2357 अंकानं ‘कोसळला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस आणि येस बँक यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजार कोसळला. सेंसेक्स तब्बल 2357 अंकानी घसरला. तर निफ्टीत 600 अंकांची घसरण झाली. असे असले तरी येस बँकेचा शेअर 34 टक्क्यांनी वधारला.

भारतील शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. यापूर्वी 24 ऑगस्ट 2015 ला सेंसेक्स 1,624 अंकांनी घसरला. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदार घाबरले आहेत.

शेअर बाजारात दबावात्मक परिस्थिती –
सकाळी 9.30 वाजता सेंसेक्स 1169.74 अंकांनी घसरुण 36,406.88 वर आला. तर निफ्टी 332.40 अंकांनी घसरुण 10.657.05 वर आला. येस बँकेचे शेअर मात्र वधारले आणि 20 टक्क्यांनी वाढले. सध्या ते 34 टक्क्यांवर ट्रेड होत आहेत. दुपारी 1 वाजता सेंसेक्स 2200 अंकांनी घसरला आणि 35, 547.27 रुपयांनी ट्रेड करु लागला.

कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या –
ओपेक देश आणि रशियात कच्चा तेलाच्या किंमतीवरुन सुरु असल्या वादाने कच्चा तेलाच्या किंमतीत 30 टक्क्यांनी घसरण झाली. तेल, गॅस शेअरमध्ये देखील कमतरता दिसून आली. बीएसईचे ऑइल अॅण्ड गॅस इंडेक्स 2.85 टक्क्यांनी घटले.

कोरोनामुळे शेअर बाजार कोसळला –
शुक्रवारी देखील शेअर बाजारात घसरण झाली होती. येस बँकेचे शेअर जवळपास 6 रुपयांपर्यंत पोहोचले होते. असे असले तरी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आणि ते 19 पर्यंत पोहोचले.

कोरोनाचा प्रकोप आणि येस बँकेवरील संकटामुळे शेअर बाजार कोसळला. शुक्रवारी शेअर बाजारात सेंसेक्समध्ये 894 अंकांनी घसरण झाली होती त्यामुळे बाजार 37,576 वर बंद झाला. तर एनएसईचा निफ्टी 327 अंकांनी घसरुण 10,942.65 ने खुला झाला आणि अखेर 289.45 अंकानी घसरुण 10,979.55 वर बंद झाला. येस बँकेच्या शेअरमध्ये अखेरपर्यंत 55 टक्के घसरण होत तो 16.55 वर बंद झाला.