‘या’ कारणामुळं शेअर बाजार 670 अंकांनी कोसळला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक बाजारात एकदम घसरण पाहायला मिळत आहे. तसेच रुपया गडगडत असल्याने भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. आज दुपारी 2 च्या सुमारास सेन्सेक्स 670 अंकानी कोसळला. बाजाराच्या शेवटी सेन्सेक्स जवळपास 642 अंकानी घसरुण 36,481.09 वर येऊन पोहचला तर निफ्टी देखील 186 अंकांना घसरुन 10,817.60 वर येऊन पोहचला.

या कारणाने शेअर बाजार कोसळतोय –
औदी अरबच्या अरामको प्लांटवर ड्रोन हल्ला आणि त्यात जागतिक बाजार कच्च्या तेलाचे वाढणारे भाव यामुळे इंधनाचे दर वाढले आहे. रुपया देखील घसरला आहे. दुपारी 1.30 वाजता सेन्सेक्स 450 अंकानी कोसळून 36,650 च्या स्तरावर आला. तर निफ्टी 140 अंकांनी घसरुण 10 हजार 870 च्या स्तरावर येईल पोहचला. सप्ताहाच्या दूसऱ्या दिवशी सुरुवातीच्या मिनटाला सेन्सेक्स 100 अंकापेक्षा अधिकने कोसळून 37 हजारापेक्षा कमी झाल्या. निफ्टी मध्ये 50 अंकानी घसरुन होऊन 10 हजार 950 स्तरावर आला.

वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण होताना दिसली. टेक महिंद्रामध्ये 2 टक्क्याने घसरण झाली. इतर वाहन कंपन्याची देखील हीच अवस्था होती. बँकिंग क्षेत्राचे शेअर देखील कोसळताना दिसले. डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी घसरला आणि 71.84 रुपये झाला. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 67 पैशांनी घसरला होता आणि 71.60 रुपये झाला.

सौदी अरबच्या दोन तेल कंपन्यांवर ड्रोन हल्ले करण्यात आले, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारकडून अनेक घोषणा करण्यात येत आहेत, परंतू त्याचा परिणाम अजूनही पाहायला मिळत नाही. जागतिक परिस्थितीमुळे सरकारचे निर्णय प्रभावी ठरत आहे.