अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात ‘दिवाळी’, सेन्सेक्स 1921 अंकांनी ‘उसळला’, 17 लाख कोटींचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली आहे. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सणासुदीच्या आधीच अर्थमंत्र्यांकडून मिळालेल्या या मोठ्या वृत्तामुळे या निर्णयाचं शेअर बाजाराकडूनही स्वागत करण्यात आलं. या नंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 900 अंकांनी उसळल्याचं पहायला मिळालं.

बॉम्‍‍‍‍बे स्‍टॉक एक्‍सचेंज (BSE) इंडेक्स सेन्सेक्स 1921 अंक एवढा वाढून 38,014 च्या स्तरावर जाऊन बंद झाला. तसेच NSE चा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 569 अंकच्या फास्ट गतीने 11,274 वर बंद झाला. एक्सपर्ट्सच्या मतानुसार आतापर्यंतची ही सर्वात जास्त तेजी आहे.

गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली होती. कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी ही घोषणा होती. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एक अध्यादेश काढून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. उत्पादन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सुद्धा टॅक्समध्ये सूट दिली जाणार आहे.

निफ्टी ने बनवले नवीन रेकॉर्ड –
व्हीएम पोर्टफोलियोचे रिसर्च हेड विवेक मित्तल यांनी सांगितले की, निफ्टी ने आज सर्वात गतिशीलतेचे रेकॉर्ड केले आहे. एक वेळी निफ्टीने 677 ने वाढला होता. निफ्टी 569 अंकावर बंद झाला. 18 मे 2009 नंतरची सगळ्यात मोठी तेजी आहे.

17 लाख कोटींचा फायदा –
विवेक मित्तल यांनी सांगितले की, शेअर बाजाराच्या या तेजीमुळे गुंतवणूकदारांना 17 लाख कोटींचा फायदा झाला आहे. अनेक मोठ्या कंपन्यांना यामध्ये खूप फायदा झाला असल्याचेही अनेकांचे मत आहे.

का आली शेअर बाजारात तेजी –
अनेक दिवसांपासून कंपन्या हा टॅक्स माफ करण्याची विनंती करत होती आणि नुकत्याच तयार झालेल्या असोसिएशनने याबाबतची मागणी देखील केली होती. ही मागणी मान्य झाल्यामुळे कंपन्यांच्या फायद्यात वाढ होणार होती. यामुळे याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर पहायला मिळाला आणि बाजारात मोठी तेजी आली.

Visit – policenama.com