×
Homeआर्थिकShare Market | ऑगस्टमध्ये डिव्हिडंटमधून कमाईची संधी देतील 5 स्टॉक्स, कंपन्यांनी ठरवली...

Share Market | ऑगस्टमध्ये डिव्हिडंटमधून कमाईची संधी देतील 5 स्टॉक्स, कंपन्यांनी ठरवली रेकॉर्ड डेट, पहा डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Share Market | पुढील महिन्यात शेअर बाजारात गुंतवणूकदारांना केवळ शेअरच्या तेजीतूनच नव्हे तर डिव्हिडंटमधून सुद्धा कमाई करण्याची संधी मिळणार आहे. 5 शेअरनी डिव्हिडंटसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. सामान्यपणे रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी एक्स-डिव्हिडंड डेट असते. (Share Market)

 

शेअरच्या फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंट दिला जातो. या दिवसापर्यंत शेअर्स खरेदी करणार्‍यांनाच कंपनी डिव्हिडंट देते. या शेअरची स्थिती आणि रेकॉर्ड डेट जाणून घेवूयात. (Share Market)

 

1. कोल इंडिया –
या कंपनीच्या गुंतवणूकदारांना 30 टक्के म्हणजे प्रति शेअर 3 रुपये लाभांश मिळेल.
यासाठी कंपनीने 12 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
याचा अर्थ त्याची एक्स-डिव्हिडंट तारीख 11 ऑगस्ट असेल. त्याच्या शेअरची सध्याची किंमत 211 रुपये आहे.

 

2. रेन इंडिया इंडस्ट्री –
ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के म्हणजेच प्रति शेअर 1 रुपये डिव्हिडंट देत आहे.
त्याची रेकॉर्ड डेटही 12 ऑगस्ट आहे. शुक्रवारी शेअर्समध्ये वाढ झाली आणि तो 176 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

 

3. आयआरसीटीसी –
ही एक मिनी रत्न कंपनी आहे. शुक्रवारी तिच्या शेअरची किंमत 637 रुपये होती.
कंपनी प्रत्येक शेअरवर 1.50 रुपये डिव्हिडंट देत आहे. कंपनीने डिव्हिडंटसाठी 19 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

4. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर –
कंपनीने लाभांशासाठी 17 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. तिच्या शेअरची किंमत 213 रुपये आहे.
शुक्रवारी शेअर तेजीत बंद झाला होता. कंपनी किती डिव्हिडंट देणार हे जाहीर केलेले नाही.

 

5. केपीआयटी टेक्नॉलॉजी –
या शेअरची सध्याची किंमत 547 रुपये आहे. कंपनीने प्रति शेअर 1.85 रुपये डिव्हिडंट जाहीर केला आहे.
कंपनीने लाभांशासाठी 17 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : – Share Market | share market earn money 5 stocks will give opportunity to earn from dividend in august companies have fixed record date see details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News