Budget च्या दुसर्‍या दिवशीसुद्धा शेयर बाजारात जबरदस्त ‘तेजी’, सेन्सेक्स 50000 च्यापुढे

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2021-22 चे सार्वत्रिक बजेट आल्यानंतर शेयर बाजारात जबरदस्त उसळीचे सत्र जारी आहे. लागोपाठ दुसर्‍या दिवशी शेयर बाजारात तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स 700 अंकाच्या वाढीसह तर निफ्टी 200 अंकाच्या तेजीसह उघडला. सेन्सेक्स आज 2.77 टक्के म्हणजे 49948 वर ट्रेड करत आहेत. तर निफ्टीबाबत बोलायचे तर निफ्टी 2.73 टक्के म्हणजे 14673 अंकांवर ट्रेड करत आहे. आज सुद्धा बँकिंग सेक्टरचे शेयर आणि ऑटो सेक्टरच्या शेयरमध्ये तेजी दिसून आली.