निधनानंतर ऋषी कपूर यांचा फोटो शेअर करत पत्नी नीतू म्हणाल्या- ‘End of our Story’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडचे दिग्गज स्टार ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. ऋषी यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशलवर पोस्ट लिहत श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबाला आधार दिला. काही अनेक इमोशनल पोस्टही शेअर केल्या आहेत. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनीही एक स्टेटमेंटदेखील जारी केलं होत. यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट सोशलवर शेअर केली आहे जी सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

नीतू कपूर यांनी त्यांच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऋषी यांच्या हातात दारूचा ग्लास आणि मागे एक दारूची बाटलीही दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर स्माईलही आहे. फोटो शेअर करताना नीतू यांनी खास कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शननं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटो शेअर करताना नीतू म्हणतात, “End of our Story.” त्यांनी म्हटलं आहे की आपल्या कथेचा शेवट झाला.

नीतू कपूर यांनी हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरताना दिसत आहे. लगेचच यावर चाहत्यांच्या ही प्रतिक्रिया येताना दिसत आहे. हजारो चाहत्यांनी फोटो लाईक करत कमेंटही केली आहे.