जुना फोटो शेअर करत अभिनेत्री माधुरी दीक्षितनं दिला ‘हा’ मेसेज !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनं सोशल मीडियावर एक खास मेसेज आणि त्यासोबत एक मोनोक्रॉम फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. माधुरीनं नुकताच तिच्या इंस्टावर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यात ती कुठेतरी दूरवर पाहताना दिसत आहे.

माधुरीनं तिचा फोटो शेअर करताना खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये माधुरी म्हणते, “नजर रस्त्यावर परंतु पाय घराच्या आत.” फोटोचं कॅप्शन आणि हा फोटो असं दोन्हीही चाहत्यांना खूप आवडलं आहे. अनेक चाहत्यांनी हा फोटो लाईक करत यावर कमेंटही केली आहे. तिच्या लुक आणि ब्युटीचं काहींनी कौतुक केलं आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.

माधुरी दीक्षित सध्या लॉकडाऊनचा सदुपयोग करताना दिसत आहे. घरात बंद असली तरीही तिनं आपली डान्स प्रॅक्टीस मात्र सुरूच ठेवली आहे. सध्या ती आपल्या गुरूकडून डान्स क्लासेस घेताना दिसत आहे. व्हिडीओ कॉलच्या साहाय्यानं ती डान्स विद्या घेत आहे. याबाबत तिनं एक व्हिडीओदेखील शेअर केला होता.

अलीकडेच माधुरीनं लोकांना फ्री डान्स ट्रेनिंग देण्याची घोषणा केली होती. सोशल मीडियावरून तिनं याबाबत माहिती दिली होती. माधुरी म्हणाली होती की, “1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत DanceWithMadhuri.com वर तिचे डान्स सेशन मोफत उपलब्ध असतील.