शर्जील इमामला हवाय ‘इस्लामी’ भारत, पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीएए आणि एनआरसीच्या विरोधात निदर्शने करताना चिथावणीखोर भाषण करणाऱ्या शर्जील इमामच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. शर्जील हा जेएनयूचा विद्यार्थी आहे. शर्जील हा कट्टरतावादी विचारसरणीकडं झुकलेला असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावे असे मानणाऱ्यांपैकी असल्याची कबुली त्याने पोलिसांच्या चौकशीत दिली असल्याची माहिती सुत्रांकडून समजतेय.

शर्जील याने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अलीगड मुस्लिम विद्यापीठात वादग्रस्त भाषण केले होते. भाषणा दरम्यान त्याने आसामला भारतापासून तोडण्याचा इशारा दिला होता. या व्यक्तव्याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता. पोलीस त्याच्या शोध घेत होते मात्र तो पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेर शर्जील याला बिहारच्या जेहनाबाद येथून अटक करण्यात आली. शर्जील सध्या दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलीस कोठडीत दिल्ली पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यात त्याने अनेक धक्कादायक गोष्टींची कबुली दिली आहे.

चौकशी दरम्यान त्याने, व्हायरल होत असलेला व्हिडीओ माझ्याच भाषणाचा आहे. त्यात कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. मात्र, ते भाषण अपूर्ण आहे. मी तासभर भाषण केले होते. त्यावेळी बोलण्याच्या ओघात आसाम देशापासून तोडण्याचं वक्तव्य केले, असे पोलिसांनी सांगितले. अटकेच्या कुठलाही पश्चात्ताप नसल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले असल्याचे समोर आले आहे. आसाम तोडण्याचे वक्तव्य त्याने जोशमध्ये केल्याचे तो सांगत असला तरी पोलीस त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नसाही. तो खूप विचारपूर्वक हे वक्तव्य केल्याचा पोलिसांच्या गुन्हे शाखेचा कयास आहे.

फेसबुक पेज लाईक करा –