शरमन जोशीनं कुटुंबासह सर्वांच्या विरोधाला पत्करून केला ‘हेट स्टोरी’ ! 5 वर्षांनंतर सांगितलं त्यामागील कारण

पोलीसनामा ऑनलाइन – 3 इ़डियट्स, रंग दे बसंतीसहित अनेक सुपरहिट सिनेमात काम करणारा अभिनेता शरमन जोशी (Sharman Joshi) यानं हेट स्टोरी 3 (Hate Story 3) सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. आज या सिनेमाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. यात त्याचे अनेक बोल्ड सीन्स होते. या सिनेमानंतर त्याच्यावर खूप टीका झाली होती. कुटुंबीयांनीही त्याला अशा सिनेमात काम न करण्याचा सल्ला दिला होता. तरीही त्यानं या सिनेमात काम केलं होतं. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यानं यावर भाष्य केलं आहे. हा सिनेमा करण्यामागील कारणाचा खुलासाही त्यानं केला आहे.

मुलाखतीत बोलताना शरमन म्हणाला, माझे मित्रमंडळी, कुटुंबीय आणि चाहत्यांनी मला या सिनेमात काम न करण्याचा सल्ला दिला होता. परंतु सिनेमाची पटकथा मला आवडली होती. अशा जॉनरमध्ये मी कधीही काम केलं नव्हतं. त्यामुळं मी या सिनेमासाठी होकार दिला होता. मी एरॉटीक जॉनरमध्ये यशस्वी होऊ शकतो का हे मला पडताळून पाहायचं होतं. अर्थात सिनेमात खूप जास्त बोल्ड सीन्स होते. परंतु सिनेमानं मला एक वेगळा अनुभव दिला. कदाचित पुन्हा मी अशा प्रकारच्या सिनेमात काम करणार नाही.

शरमनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच तो मुंबई सागा या सिनेमात दिसणार आहे. त्यानं रंग दे बसंती, 3 इ़डियट्स गोलमाल, लाईफ इन ए मेट्रो, ढोल, 3 इडियट्स, फरारी की सवारी, वार, छोड ना यार, मिशन मंगल अशा अनेक सुपरडुपर हिट सिनेमात काम केलं आहे.

You might also like