तैमुरबाबतची ‘ही’ गोष्ट माहित झाल्यानंतर ‘चकित’ झाल्या शर्मिला टागोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या दिग्गज अदाकारा शर्मिला टगोर आपला नातू तैमूरच्या प्रसिद्धीला घेऊन खूप जागरूक नव्हत्या. त्या जेव्हा कधी असं ऐकायच्या की, तैमूरचा फोटो सोशलवर व्हायरल झाला आहे तेव्हा त्या विचार करायच्या की, बहुतेक मुलांच्या फोटोंच्या विशेष मालिकेत तैमूरच्या फोटोंना पसंती मिळत असावी. खास बात अशी की, याची चर्चा घरातील लोक करतात. परंतु प्रियंका चोपडा आणि निक जोनासच्या लग्नाचे फोटो जेव्हा समोर आले आणि लोकांनी सांगितले की, प्रियंका चोपडाच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत आणि इंटरनेटवर तैमूर अली खान प्रियंका-निकच्या फोटोंना टक्कर देत आहे. त्यावेळी त्या खूपच चकित झाल्या.

त्या म्हणतात की, “तैमूरचं फॅन फॉलोविंग आणि फोटो व्हायरल होण्याबाबत मला जास्त काही कल्पना नाही. मी कोणत्याही सोशल साईटवर, ट्विटर किंवा फेसबुकवर देखील नाही. मला वाटायचं की, मुलांच्या फोटोंचा काही वेगळा क्रायटेरिया असेल ज्यामध्ये तैमूर टॉपवर आहे. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रियंका चोपडा आणि निक जोनासच्या लग्नाचे फोटो समोर आले होते तेव्हा मला समजलं की, तैमूरचं स्टारडम किती मोठं आहे ते. तैमूर तर तेव्हा प्रियंका चोपडाच्या लग्नाच्या फोटोंना कॉम्पिटिशन देत होता.”

पुढे शर्मिला टागोर म्हणतात की, “मला याबाबत काहीही कल्पना नव्हती. हे पाहून आणि सर्व काही ऐकून मी आश्चर्यचकित झाले होते. मी खरंतर स्पीचलेस झाली होती. ”

आरोग्यविषयक वृत्त  (www.arogyanama.com)

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like