शर्मिला टागोरनं ‘या’साठी केलं होतं बिकिनी फोटोशुट ! सांगितलं कसा लाजून पाणी पाणी झाला होता फोटोग्राफर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमधील सुंदर अ‍ॅक्ट्रेस शर्मिला टागोर (Sharmila Tagore) तिच्या जमान्यातील हिट अँड बोल्ड अ‍ॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. शर्मिलानं आपल्या काळात म्हणजेच 60 आणि 70 च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले आहेत. शर्मिलानं काश्मीरची कली पासून तर बिकिनी लुकपर्यंत अनेकदा अटेंशन घेतलं आहे आणि चर्चेत आली आहे. जेव्हा तिनं पहिल्यांदा पडद्यावर स्विमसूट घातला होता तेव्हा ती जोरदार चर्चेत आली होती. जेव्हा शर्मिला बिकिनी घालून समोर आली होती तेव्हा तिची फजिती झाली होती. ती घटना ती कधीच विसरू शकत नाही.

अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत बोलताना शर्मिलानं सांगितलं की, मी एका मॅगेझिनसाठी बिकिनी फोटोशुट केलं होतं. लोक मला हे काम कधीच विसरू देत नाहीत.

ऑगस्ट 1966 मधील अंकासाठी तिनं टू पीस बिकिनी घातली होती. याचीही जोरदार चर्चा झाली होती. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, मला नाही माहित मी ते फोटोशुट का केलं होतं. माझ्या लग्नाच्या काही काळापूर्वीचीच ती गोष्ट आहे. जेव्हा मी बिकिनी घालून फोटोग्राफर समोर आले तेव्हा त्यानं मला हेच विचारलं की, मी यासाठी पूर्णपणे तयार आहे का.

शर्मिला सांगते, फोटोग्राफर माझ्यापेक्षाही जास्त चिंतीत होता. त्यांनं मला खूपदा माझं शरीर झाकायला सांगितलं होतं. पंरतु मला काहीच वाटत नव्हतं. जेव्हा लोकांनी मला कव्हर पेजवर बिकिनीत पाहिलं आणि प्रतिक्रिया दिल्या तेव्हा माझी अडचण सुरू झाली. मी हैराण झाले होते की, लोकांना माझा हा फोटो का आवडला नव्हता. मला वाटतं की, मी त्यात चांगली दिसत होते.

शर्मिलानं असंही सांगितलं की, काही लोकांनी तर याला स्वस्त पब्लिसिटी मिळवायचं माध्यम म्हटलं. काहींनी याला विचार न करता केलेलं काम म्हटलं. मला त्याचा तिरस्कार वाटू लागला. असंही असू शकतं की, माझ्या आत एक निदर्शक लपली आहे. त्यावेळी मी तरूण होते आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं.

शर्मिलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2010 साली आलेल्या दानिश आलम यांच्या सिनेमात ती खूप ब्रेकनंतर दिसली होती. शर्मिला टागोर बिकिनी घालणारी पहिली भारतीयअ‍ॅक्ट्रेस होती. मॅगेझिन मध्ये छापून आलेल्या तिच्या बोल्ड फोटोनंही खूप खळबळ उडवली होती. 1967 साली रिलीज झालेल्या अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस (An Evening in Paris) सिनेमात शर्मिलानं स्विम सूट घातला होता. असं करणारी ती पहिली भारतीय अ‍ॅक्ट्रेस होती.