‘तो’ क्षण पाहून अंगावर काटा आला, शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. 14 वर्षानंतर मनसेचे महाअधिवेशन होत आहे. या राज्यव्यापी मेळाव्यात अमित ठाकरे यांचे लाँचिंग करण्यात आले. अमित ठाकरे यांच्या एन्ट्रीने आज ठाकरे घराण्यातील आणखी एका नव्या युवा नेत्याची राजकारणात एन्ट्री झाली.

अमित ठाकरे सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची घोषणा होताच मनसैनिकांनी प्रचंड जल्लोष करत त्यांचे स्वागत केले. अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे याही भावूक झाल्याचे पहायला मिळाले. अमित ठाकरे यांच्या सक्रिय राजकारणात उतरण्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, हा क्षण पाहून अंगावर काटा आल्याचे सांगितले.

अमित ठाकरे यांच्या सक्रिय राजकारणात एन्ट्री झाल्यानंतर त्यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली. यावर बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, आई म्हणून माझा आशीर्वाद आणि शुभेच्छा त्याच्या सोबत आहेतच. आजच्या क्षणाची आम्ही सगळेच वाट पहात होतो. आम्ही हे सगळं केवळ प्रसारमाध्यमांतून ऐकत होतो. कारण आम्हाला कुणालाही याबाबत आधी कल्पना दिली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हा क्षण पाहून माझ्या अंगावर काटा आला. मन भरून आलं, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

तसेच अमितची कोणाशीही तुलना करण्याची गरज नाही. त्याने समाजासाठी चांगलं काम करणं जास्त महत्त्वाचं असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –