शर्मिला येवलेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यावर ‘शाई फेक’ !

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ता शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिशय शाई फेकून निषेध केला. शासनाने महापोर्टल बंद केले, अकोले तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नगर जिल्ह्यात महाजनादेश यात्रेच्या दौऱ्यावर आहेत. आज पहिल्यांदा ते अकोले येथे आले होते. अकोले येथे महाजनादेश यात्रा सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील काही वाहनांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या येवले यांनी शाईचा फुगा फेकून निषेध केला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात बेरोजगार तरुणांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. नागरिकांच्या उपयोगाचे महापोर्टल बंद करण्यात आले. तसेच अकोले तालुक्यातून वैभव पिचड यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई पडल्यानंतर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

आरोग्यविषयक वृत्त –