Sharvari Wagh | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात ‘शर्वरी’ करतेय विकी कौशलचा भाऊ ‘सनी’ला डेट?

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन –  Sharvari Wagh | बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ (katrina kaif) यांच्या अफेअरची तर कधी साखरपुड्याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगलेली दिसते. विकी कौशल प्रमाणेच त्याचा भाऊ सनी (sunny kaushal) देखील चर्चेत आला आहे. सध्या सनीच्या अफेअरचीच सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसते. मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) हिच्याशी त्याचे नाव जोडले जात आहे. शर्वरी हि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Ex Chief Minister Manohar Joshi) यांची नात आहे. शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध उद्योगपती आहेत.

‘द फरगॉटन आर्मी’ मध्ये शर्वरी (Sharvari Wagh) आणि सनीने एकत्र काम केले आहे.
त्यावेळेपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु असून दोघांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘बंटी और बबली’च्या सीक्वलमध्ये शर्वरी दिसणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार आहे.
तिच्यासोबत ‘गली बॉय’ फेम सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘प्यार का पंचनामा २’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’
या चित्रपटांसाठी शर्वरीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. बालपणी शर्वरीने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.

 

सनी कौशलचा २८ सप्टेंबरला होता वाढदिवस

सनी कौशलचा २८ सप्टेंबरला वाढदिवस होता. विकी (vicky kaushal) आणि कतरिनाने सनीला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छाही दिल्या होत्या.
कतरिनाने तिच्या इन्टास्टोरीला सनीचा एक फोटो शेअर केला तसेच हॅपी बर्थ डे सनी, मी देवाकडे प्रार्थना करेन की तुझे सर्व दिवस प्रेम आणि आनंदाचे जावो असा मजकूरही लिहिला होता.
तर विकीनेही भावाचा फोटो शेअर करत हॅपी बर्थडे मेरे जिगर के तुकडे असं कॅप्शन देत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

 

Web Title : Sharvari Wagh | ex chief minister manohar joshi grand daughter sharvari wagh may be dating with sunny kaushal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

High Court | सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा अधिकार नाही – उच्च न्यायालय

Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस या भागात ‘धो-धो’ पावसाचा इशारा

SBI PO Recruitment 2021 | SBI मध्ये 2056 जागांसाठी बंपर भरती, जाणून घ्या प्रक्रिया