Shasan Aplya Dari | शासन आपल्या दारी…! कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना

पोलीसनामा ऑनलाइन – Shasan Aplya Dari | राज्य शासनाने (Maharashtra State Govt) अपारंपरिक ऊर्जा (Non-Conventional Energy) स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम- कुसुम – PM-KUSUM) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे (Pradhan Mantri Kisan Urja Surakshaevam Utthaan Mahabhiyan Yojana (PM-KUSUM Scheme). त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे एक प्रकारे ‘शासन आपल्या दारी’ आले आहे. (Shasan Aplya Dari)

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने २२ जुलै २०१९ रोजी पीएम- कुसुम योजनेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या. तसेच १३ जानेवारी २०२१ रोजी १ लाख सौर कृषिपंप व ३० ऑगस्ट २०२२ रोजी पुढील १ लाख असे एकूण २ लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली. महाराष्ट्र शासनाकडून १२ मे २०२१ रोजी राज्यात या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी १ लाख नग या प्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये ५ लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे. (Shasan Aplya Dari)

या अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पंपांची वस्तू व सेवा करासह किंमत निश्चित करण्यात आलेली आहे. ३ अश्वशक्तीच्या पंपाची किंमत १ लाख ९३ हजार ८०३ रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याने १० टक्के लाभार्थी हिस्सा १९ हजार ३८० रुपये, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्याने ५ टक्के लाभार्थी हिस्सा प्रत्येकी ९ हजार ६९० रुपये भरणे आवश्यक राहील. ५ अश्वशक्तीच्या पंपाची किंमत २ लाख ६९ हजार ७४६ रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याने २६ हजार ९७५ रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्याने १३ हजार ४८८ रुपये इतका लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक राहील. ७.५ अश्वशक्तीच्या पंपाची किंमत ३ लाख ७४ हजार ४०२ रुपये इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याने ३७ हजार ४४० रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्याने १८ हजार ७२० रुपये लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक राहील.

सौर कृषिपंप आस्थापनेचे उद्दिष्ट, पीएम-कुसुम योजनेच्या शासन निर्णयातील नमूद तरतूद, जिल्ह्याच्या ग्रामीण लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पूर्ण करावयाचे आहे. महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी १७ मे २०२३ पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महाऊर्जा मार्फत ऑनलाईन पोर्टल सुरु केल्यानंतर त्यास राज्यभरातील शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आनॅलाईन पोर्टल सुरू केल्यापासून राज्यातून एकूण २३ हजार ५८४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक २ हजार ६०२ अर्ज आले आहेत. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.

रविंद्र जगताप, महासंचालक, महाऊर्जा, पुणे (Ravindra Jagtap, Director General, Mahaurja, Pune) :
योजनेची व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट,
सव्या संकेतस्थळाचा वापर करु नये. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणीसाठी ०२०-३५०००४५६ / ०२०-३५०००४५७ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.

– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे (District Information Office, Pune)
(DIO Pune)

Web Title : Shasan Aplya Dari | For agricultural pumps Pradhan Mantri Kisan Urja Surakshaevam Utthaan Mahabhiyan Yojana (PM-KUSUM Scheme)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात मैत्रीणीकडून ‘जीवलग’ मित्राची चाकूने सपासप वार करून हत्या

Wrestlers Protest | बृजभूषण सिंह यांना का पाठीशी घातलं जातंय?, कुस्तीपटूंवरील कारवाईवर ठाकरे गटाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Pune Lok Sabha Bypoll Election | पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा?, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics News | जागावाटपाची चर्चा मीडियात करण्याची गरज नाही, भुजबळांनी टोचले नेत्यांचे कान

Pune News | आराखडा आणि निधी तयार असूनही का रखडले आहे ससून रूग्णालयाचे नूतनीकरण ?