‘ब्रिटन्स गॉट टॅलेंट’मध्ये भारतीय वंशाच्या मुलीची जादू, शशी थरूरनं केलं Vote साठी आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कॉंग्रेसचे लोकसभेचे खासदार शशी थरूर यांना देश आणि जगाच्या बातम्यांव्यतिरिक्त करमणुकीतही रस आहे. त्यांनी ट्विटरवरील लोकांना एका छोट्या मुलीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या मुलीचे नाव सौपर्णिका नायर आहे जिने ब्रिटनच्या गॉट टॅलेंटच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. शशि थरूर यांनी लोकांना या भारतीय टॅलेंटला मत देण्याची विनंती केली आहे.

शशी थरूर यांनी ट्विट केले की, ‘दहा वर्षांची भारतीय मुलगी ब्रिटनच्या गॉट टॅलेंटच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. तिची उत्कृष्ट गाणी ऐका. आणि दुपारी अडीच वाजेपर्यंत वोट करा.’ शशी यांनी सौपर्णिका नायकच्या गाण्याची यूट्यूब लिंक देखील सोबत शेअर केली आहे. सौपर्णिकाला वोट देण्याची वेळ भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजेपर्यंत आहे.

सौपर्णिका एक उत्तम गायिका आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की आपल्या प्रतिभेने तिने ब्रिटनच्या सिंगिंग जजेसना प्रभावित केले आहे. या टॅलेन्टमुळे सौपर्णिकाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. चारही जजेस कडून तिला स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले आहे, जी की कोणत्याही स्पर्धकासाठी खूप मोठी कॉप्लीमेंट असते. तिच्या ऑडिशनमध्ये सौपर्णिकाने न्यायाधीशांना ‘ट्रॉली सॉंग’ ने प्रभावित केले होते. प्रत्येक वेळी सौपर्णिकाने जजेस पुढे चांगला परफॉर्मन्स सादर केला आहे. ब्रिटन गॉट टॅलेंट 2020 च्या जजेस पॅनलमध्ये अ‍ॅशले बॅन्झो, अमांडा होल्डन, डेव्हिड विल्यम्स आणि अलेशा डिक्सन हे आहेत.