परदेशात नेहरूंची लोकप्रियता दाखविण्यासाठी शशि थरूरांनी Twitter वर शेअर केला फोटो, करून बसले ही ‘घोडचूक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या ट्विटची कायमच चर्चा असते आणि थरूर हे चालू घडामोडींवर भाष्य करणारेच ट्विट करत असतात. नुकतेच थरूर यांनी एक ट्विट केले ज्यात त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे काही फोटो शेअर केले होते.

थरूर यांनी हे जुने फोटो टाकत असे म्हंटले होते की 1954 मध्ये अमेरिकेतील नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या स्वागतासाठी आलेली गर्दी पहा आणि ही सर्व गर्दी कोणत्याही पी आर शिवाय आणि कॅम्पेन शिवाय आलेली आहे. देशाच्या पंतप्रधानाला विदेशात मिळणारी प्रसिद्धी ही काही नवीन नाही असे थरूर यांना सांगायचे होते. मात्र या ट्विटमध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली.

अनेकांनी यावर कमेंट करून आपले म्हणणे मांडले आहे. एकाने म्हंटले आहे की हे फोटो अमेरिकेतील नाहीत. हे फोटो 1956 असून ते मॉस्को मधील आहेत.

https://twitter.com/IndiaHistorypic/status/1176186764366508032

शशी थरूर यांना आपली चूक समजली आणि त्यांनी पुन्हा ट्विट करत असे लिहिले की, मला सांगण्यात आले होते की हे फोटो अमेरिकेतील आहेत ना की मॉस्कोचे मात्र असे असले तरी ही गोष्ट खोटी नाही की माजी पंतप्रधानांना विदेशात खूप प्रसिद्धी मिळत असे. जेव्हा नरेंद्र मोदींना सन्मानित केले जाते तेव्हा भारतीय पंतप्रधानांना सन्मानित केले जाते. हा सन्मान भारतासाठी आहे.

Visit : policenama.com