Shashi Tharoor | शशी थरूर यांनी गायले – ‘एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई…’ ऐका त्यांचा सुरेल आवाज, VIDEO

नवी दिल्ली – Shashi Tharoor | काँग्रेस खासदार शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) आपल्या इंग्रजीसाठी खुप प्रसिद्ध आहेत. प्रत्येकाला वाटते की त्यांच्यासारखे विद्वान व्हावे. परंतु हे खुप थोड्या लोकांना माहित असेल की ते गाणी सुद्धा गातात. होय, त्यांनी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर (Shrinagar) मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गाणे गायले. ही माहिती त्यांनी स्वता ट्विट करून दिली आहे. ’एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई…..’ हे हिंदी गाणे त्यांनी गायले (Shashi Tharoor sang the Hindi song ‘Ek Ajnabi Hasina Se Mulakat Ho Gayi …..’.).

त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेयर करत लिहिले आहे की, माहिती तंत्रज्ञान संसदीय स्थायी समितीसाठी दूरदर्शन श्रीनगरद्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानंतर लोकांनी मला गाणे गाण्यासाठी राजी केले. मी कोणत्याही तयारीशिवाय गायले, पण तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

शशी थरूर शनिवारी माहिती तंत्रज्ञान संसदीय स्थायी समितीच्या सदस्यांसह जम्मू-काश्मीरच्या उप राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. यानंतर ते श्रीनगर दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात थरूर यांनी गाणे गायले.

हे देखील वाचा

Pune Crime | खडकीत तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खुन

Electric Bike | अवघ्या 7 रुपयांच्या खर्चात 100 किलोमीटरपर्यंत धावते ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, किंमत 50 हजार; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  when shashi tharoor sang ek ajnabee hasina se mulakat ho gayi hear his melodious voice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update