जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात ‘समावेश’ ? राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ नेत्याच्या नावावर ‘शिक्कामोर्तब’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या जेष्ठ नेत्यांच्या बैठकीत शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्यावर आता मंत्री पदाची जबाबदारी वाढल्याने पक्षाने हा निर्णय घेतल्याचे समजते.विशेष म्हणजे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी देखील या नावाला संमती दर्शवल्याचे समजते.

जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधव यांनी या आधी पक्षाचे कार्यध्यक्ष म्हणून पाहिलेले आहे. जाधव हे सध्या शिवसेनेत गेलेले असून आव्हाड यांना आता मंत्रिपद मिळणार असल्याचे समजते. तसेच राष्ट्रवादीचे सध्याचे धडाडीचे नेते धनंजय मुंडे यांचे नाव देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते मात्र त्यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे समजते.

शशिकांत शिंदे यांना थोड्याच मतांनी विधानसभा गमवावी लागली होती मात्र शरद पवारांचे एकदम विश्वासू असल्यामुळे त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत झाले असल्याचे समजते.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या एक दोन दिवसात ठाकरे सरकारचा मंत्री मंडळ विस्तार पार पडणार आहे. राष्ट्र्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते लवकरच आता मंत्री पदाची शपत घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच ठाकरे सरकारने शेतकरी कर्जमाफीसारखे अनेक महत्वाचे निर्णय जाहीर केलेले आहेत.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/