Shashikant Shinde | सातार्‍यामध्ये शशिकांत शिंदेंना ठरवून पाडलं ! राष्ट्रवादीनेच केला NCP चा ‘करेक्ट कार्यक्रम’?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shashikant Shinde | सातारा जिल्हा बँक निवणुकांचा निकाल (satara district bank election) हाती आला. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निकाल म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा. संपूर्ण साताऱ्यात सामान्य कार्यकर्त्यांना डावलणे आणि पडपडीचे राजकारण करणे याला कंटाळलेल्या राष्ट्रवादी पक्षानेच राष्ट्रवादी पक्षाचा (NCP) करेक्ट कार्यक्रम करून दाखवला आहे. कोरेगावमध्ये सुनील खत्री हे जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून गेले, मात्र त्याचवेळी जावळी मतदार संघातून आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा १ मताने पराभव झाला. या पराभवा पाठीमागे मोठे षड्यंत्र असल्याचं म्हटलं आहे.

आता, शिवसेनेने सहकारी बँकांच्या निवडणूक निकालावर मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य केले आहे. विशेष म्हणजे साताऱ्यातील निकाल धक्कादायक असल्याचे म्हंटले आहे. सातारा बँकेत रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar), उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale), शेखर गोरे (Shekhar Gore) वगैरे प्रमुख लोक निवडून आले, पण शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना ठरवून पाडले गेले. कारण शिंदे विजयी झाले असते तर जिल्ह्य़ातील सहकाराची सूत्रे त्यांच्या हाती गेली असती असे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

 

शिंदेंचा पराभव घडवून आणण्यात राष्ट्रवादीचेच लोक
सातारा, जळगाव, सांगली, धुळे, नंदुरबार, लातूर, रत्नागिरी या जिल्ह्यातील सहकारी बँकांचे निवडणुकांचे निकाल लागले आहेत. अनेकांना हादरे बसले. यामध्ये शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), के. सी. पाडवी (K. C. Padvi) यांचा समावेश आहे. या निकालावरून एक मात्र नक्की की सहकार क्षेत्रात सत्तेमुळे भाजपला जी सूज आली होती ती पुरती उतरली आहे. मात्र, साताऱ्यातील निवडणूक निकाल विचार करायला लावणारा आहे. जिल्हा बँकेत हेवीवेट समजले जाणारे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा त्यांच्याच पक्षातील एक सद्धे कार्यकर्ते असणारे रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी एका मताने पराभव केला. त्यामुळे शिंदे यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर हल्ला केला, दगडफेक केली त्यांच्या पराभवामागे राष्ट्रवादीचेच लोक सक्रिय होते असा थेट आरोप शिवसेनेनं केला आहे.

शिंदेंना पराभूत करुन कोणी बाजी मारली?
शिंदे यांचा पराभव का झाला? कोणी केला? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण यानिमित्ताने जी छोटेखानी दंगल झाली ते चित्र बरे नाही. रामराजे निंबाळकर, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, शेखर गोरे वगैरे प्रमुख लोक सातारा बँकेत निवडून आले, पण शशिकांत शिंदे यांना ठरवून पाडले गेले. शिंदे हे शरद पवार यांचे कडवट अनुयायी असून त्यांचा विजय झाला असता असता तर जिल्ह्यातील सहकाराची सूत्र त्यांच्या हाती गेली असती. त्यामुळे त्यांना पराभूत करून कोणी बाजी मारली?, असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

 

आमदार शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका..
शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे जिल्हा बँकेच्या राजकारणात कायमच किंगमेकरच्या भूमिकेत होते.
त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदा बँकेत प्रवेश करू दयायचा नाही असा निर्धार नेतेमंडळींनी केला होता.
त्यासाठी गेले वर्षभर अनेक मंडळी कामाला लागली होती. कोरेगाव, जावळी मध्ये या मंडळींनी चांगल्या पद्धतीने व्यूहरचना केली होती.
शशिकांत शिंदे कोरेगावातून निवडणूक रिंगणात उतरले तर कोणाला उमेदवारी दयायची आणि जावळीतून
त्यांच्या विरोधी कोणी उमेदवारी करायचे हे सर्व अगोदर ठरले होते. हे मात्र आता समोर येऊ लागले आहे.
शशिकांत शिंदे यांचा २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर पराभवाची मालिका खंडित होण्याचे नाव काही घेत नाही.
त्यातच जिल्हा बँकेतील पराभव हा आमदार शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका मानला जात आहे.

 

Web Title :- Shashikant Shinde | udayan raje shivendra raje won satara shashikant defeated shashikant shinde says shiv sena samana satara district bank election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

President Ram Nath Kovind To Visit Raigad | राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘या’ तारखेला रायगडला देणार भेट

Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर

Pune Crime | लष्करात असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून 30 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्यचार