Shashikant Shinde | शिवेंद्रसिंहराजेंची राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंवर खरमरीत टीका, म्हणाले…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक (Satara District Bank Election) निकालानंतर आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता शिवेंद्रराजे यांनी या टीकेला उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे बगलबच्च्यांनी चुकीच्या पद्धतीने कान भरले आहेत. अनेक लोक त्यांच्यापासून दूर जाण्यामागे हेच कारण आहे. त्यामुळेच जिल्हा बँकेमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आपल्या पराभवाचे खापर त्यांनी आमच्यावर फोडू नये, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

 

जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांच्या सत्काराचे आयोजन सोनगाव (ता जावळी ) येथे करण्यात आले होते.
त्यावेळी ते बोलत होते. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde ) यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.
मी काही मोठा कार्यसम्राट आमदार नाही आणि माझी पोहोच जिल्हाभर नाही. त्यामुळे मी सांगितले म्हणून पराभव झाला, असे त्यांचे म्हणणे अयोग्य आहे.
संघर्ष होऊ नये यासाठी मी प्रयत्न केले आहेत, ज्ञानदेव रांजणे यांची समजूत काढण्याचा मी प्रयत्न केला.
पण उचापतींमुळे आमदार शिंदे यांची जावळी तालुक्यातील जनमानसातली प्रतिमा खालावली आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपल्याच पक्षातील लोकांना जावळी तालुक्यामध्ये त्यांनीच पहिल्यांदा पाडापाडीचे राजकारण केले असा आरोपही त्यांनी केला.

 

Web Title : Shashikant Shinde | why are you attacking us shivendra singh raje bhosale criticism shashikant shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sanjay Raut | संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना ‘रोखठोक’ सवाल, म्हणाले – ‘नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री की पहाटे?’

IND Vs SA | टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर क्रीडा मंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vaishali Agashe | LIC च्या सातारा विभागीय कार्यालयाच्या खेळाडू वैशाली आगाशेंची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड