पुण्यातील सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार बाबु मल्लिकार्जुन शेकापुरे (वय-२७, रा. गुलटेकडी, पुणे) याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ -२ चे पोलीस उप आयुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी शेकापुरे याच्या हद्दपारीचे आदेश बुधवारी (दि.१६) काढले.

शेकापुरे याच्यावर जखमी करणे, मारहाण करुन शिवीगाळ करणे, खून, खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगा करणे, दहशत पसरवणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

परिमंड – २ चे पोलीस उप आयुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी शेकापुरे याला दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश बुधवारी दिले. तसेच हद्दपारीच्या कालावधीमध्ये तो परिसरात आढळून आल्यास नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.