शास्तीकर अध्यादेशची अंमलबजावणी तातडीने करावी – नगरसेवक प्रमोद कुटे

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतींना लावलेला जाचक शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा  अध्यादेश महापालिकेला प्राप्त झाला असून त्याची तातडीने अंमलबजावणी सुरु करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c93f407-d1cd-11e8-bde5-c34fc3769fa3′]

नगरसेवक कुटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफीच्या निर्णयामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारकडून महापालिकेला प्राप्त झाला आहे. परंतु महापालिकेने त्यांची अद्यापही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांनी आपला मूळ मिळकत कर भरला नाही. परिणामी, महापालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

अमित शाहांचा मुंबई दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

त्यासाठी राज्य सरकराच्या अध्यादेशाची महापालिकेने त्वरित अंमलबजावणी सुरु करावी. महासभेची मान्यता न घेता अध्यादेशानुसार कराची आकारणी करावी. त्यामुळे महापालिकेच्या मिळकतकरावरील ९० टक्के सूट योजनेचा फायदा सामान्य नागरिकांना घेता येईल. तसेच थकित मिळकत कर जमा होण्यास मदत होईल.

[amazon_link asins=’B073JWXGNT,B004G60AD6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5987428-d1cd-11e8-aff7-73efd39604b6′]

त्याचबरोबर आत्तापर्यंत ज्या नागरिकांनी शास्तीकर भरला आहे. त्या नागरिकांची शास्तीकराची रक्कम परत करावी. अथवा ती रक्कम त्यांच्या मूळ मिळकत करामध्ये वर्गीकृत करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांच्यावरही अन्याय होणार नाही, अशी मागणी नगरसेवक कुटे यांनी निवेदनातून केली आहे.

जाहीरात