पाकिस्तानात ‘या’ लोकांसोबत दिसले शत्रुघ्न सिन्हा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतीच लाहोमधील एका लग्नाला हजेरी लावली होती. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की, लग्न समारंभातील लोक तेव्हा चकित झाले जेव्हा त्यांना त्यांच्यामध्ये अचानक शत्रुघ्न सिन्हा दिसले. दोन्ही देशात तणाव असताना शत्रुघ्न यांची उपस्थिती म्हणजे त्यांच्यासाठी सुखद आश्चर्य होतं.

शत्रुघ्न सिन्हा लग्न समारंभात पाकिस्तानी अदाकारा रीमा खानसोबत दिसले. त्यांचा एक व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायल होताना दिसत आहे. आलपाकड्रामा या ऑफिशियल वेबसाईटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात लिहिलं हे की, दिग्गज बॉलिवूड अभिनेते आणि नेता शत्रुघ्न सिन्हा लाहोरमध्ये एका लग्न समारंभात दिसले. फिल्म स्टार रीमा खानही तिथे उपस्थित होती.”

मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, शत्रुघ्न सिन्हा पाकिस्तानी व्यावसायिक असद अहसन यांच्या मुलाच्या लग्नासाठी लाहोरला आले होते. असंही सांगण्यात आलं आहे की, ते दोन दिवसांसाठी पाकिस्तानात आले आहेत आणि ते काही राजकीय नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता लोक त्यांना ट्रोल करत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर कमेंट केली आहे. कोणी त्यांना देशद्रोही म्हटलं आहे तर कोणी त्यांना घाणेरडं राजकारण करणारे म्हटलं आहे.

You might also like