मी भाग्यवान आहे, माझे नाव मीटूमध्ये आले नाही : शत्रुघ्न सिन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेते आणि लोकसभेचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज आपले मीटू प्रकरणावरील मत व्यक्त केले आहे. आज देशात मीटूचे वादळ आहे. मला हे सांगण्यास कोणताही संकोच वाटत नाही कि, प्रत्येक व्यक्तीला बदमान करणारी एक महिलाच असते. तसेच मीटू प्रकरण हि मजेत घ्यायची बाब नसून त्यावर सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची बाब आहे असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. लेखक ध्रुव सोमानी यांच्या पुस्तक विमोचन कार्यक्रमाला आले असता ते या बाबत बोलत होते.

आज मीटू प्रकरण सुरु आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने मी पहिले आहे कि, यशस्वी पुरुषांची तणावाची स्थिती आणि समस्यामागे महिलाच असते तसेच त्या पुरुषाच्या बदनामीत हि महिलांचीच प्रकरणे अधिक करून जोडली जातात असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत.

वास्तविक मी स्वतःला भाग्यवान समजतो कि माझे नाव मीटू प्रकरणात आले नाही. मी माझ्या बायकोचे ऐकणारा माणूस आहे. माझे वैवाहिक जीवन खूप चांगले आहे. माझी पत्नी पूनम एक देवी आहे आणि तीच माझे सर्वकाही आहे. त्यामुळे कोणाला माझ्या विषयी काय बोलायचे असेल तर त्यांनी ते बोलू नये असे शत्रुघ्न सिन्हा म्‍हणाले आहेत.

तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावर मानसिक शोषणाचे आरोप केल्या नंतर मीटू मोहम सुरु झाली होती. या मोहिमेत बॉलिवूड मधील भल्या भल्या हस्तींची नावे अनेक महिलांनी लैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी उजेडात आणली होती.