वडिलांच्या काँग्रेस प्रवेशाविषयी सोनाक्षी सिन्हा म्हणते …

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा चैत्र पाडव्याचा मुहुर्त साधत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीनंतर सिन्हा यांनी ही माहिती दिली. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजपमधून काँग्रेस प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय उशिरा घेतला असल्याचे सोनाक्षीने म्हटले आहे.

वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या यांच्या पक्षांतराविषयी सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, ‘काँग्रेसमध्ये प्रवेश करणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मला असं वाटतं की जर तुम्ही आनंदी नसाल तर बदल केला पाहिजे आणि त्यांनी तेच केलं. आपले वडिल सुरूवातीपासून भाजपसोबत जोडले गेले आहेत. आपल्या वडिलांना जे. पी. नारायण, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात आदर मिळाला. तो आता मिळाला नाही. मला वाटतं की त्यांच्या गटाला पक्षाकडून योग्य ते अधिकार दिले नाहीत. त्यासाठी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी याआधीच घेतला पाहिजे होता. त्यांनी हा निर्णय घेण्यास उशिर केला. आता ते काँग्रेसमध्ये कोणत्याही दबावाशिवाय चांगले काम करतील आणि एका बाजूला पडणार नाहीत अशी आशा वाटते.’

नेहमी पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांचा आगामी लोकसभेसाठी भाजपकडून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मत्री रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरवले आहे.

Loading...
You might also like