दाढी केल्यानंतर आफ्टर शेव लोशन लावणे चांगले कि तुरटी ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या, दाढी वाढवण्याचा ट्रेंड जोरात सुरु आहे, परंतु अजूनही काही लोकांना दाढी करायला आवडते. असे बरेच लोक आहेत जे बाहेर जाऊन दाढी करतात. त्याचबरोबर काही लोक असे आहेत ज्यांना घरी दाढी करायला आवडते. बऱ्याच पुरुषांना दाढी केल्यावर प्रश्न पडतो कि, चेहऱ्यावर काय वापरावे, जेणेकरून जळजळ कमी होईल आणि चेहरा मऊ राहील. आज पुरूष दाढीनंतर अफ्टर शेव लोशन वापरतात, तर पूर्वीच्या काळात लोक दाढी केल्यावर तुरटी वापरायचे.

आफ्टर शेव आणि तुरटीतील फरक
दाढीनंतर तुरटी लावण्याची परंपरा बर्‍याच काळापासून चालू आहे. यानंतर, आफ्टर शेव लोशन लावण्याचा ट्रेंड वाढला आहे. आपण घरी दाढी केल्यांनतर किंवा नाव्ह्याकडे दाढी केल्यानंतर तुरटी किंवा आफ्टर शेव लोशन लावल्यानंतर आपली त्वचा मऊ होते. सोबतच चेहऱ्यावर जळजळ होत नाही. मात्र, तुरटी आफ्टर शेव लोशनपेक्षा स्वस्त आहे. यासह, तुरटी आरामदायक असून त्यामुळे जळजळ होत नाही. एवढेच नव्हे तर तुरटी आपल्याला कोठेही सहज उपलब्ध होते. आपण कोणत्याही किराणा दुकानात ते सहज मिळून जाते, तर दुसरीकडे तुम्हाला आफ्टर शेव लोशन घेण्यासाठी दुकानात जावे लागेल, जे कदाचित आपल्या घरापासून खूप दूर असेल.

तुरटीचे इतर उपयोग
– आपण हे पॅन्टी लाइनच्या भागावर देखील वापरू शकता.
– अँटी- फंगल गुणधर्मांमुळे आपण आपल्या अंडरआर्मवर देखील तुरटी वापरू शकता.
– कमरेच्या इलास्टकच्या भागावरही तुरटीचा वापर केला जातो.
– ब्राच्या पट्टी असलेल्या भागामध्ये अंघोळ करताना तुरटीचा तुकडा हलका चोळा, यामुळे घामाचा वास येत नाही.
– या व्यतिरिक्त ज्या लोकांना खाज सुटण्याची समस्या आहे ते देखील तुरटी वापरू शकतात.
– मिठाई बनवण्यासाठी देखील काही हलवाई तुरटी वापरतात.

दरम्यान, आफ्टर शेव लोशनच्या तुलनेत तुरटी चांगली आहे, कारण ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, जी कोणत्याही भेसळविना तयार होते. दाढीनंतर जर तुम्ही तुरटीने चेहरा स्वच्छ केला तर यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा सहज निघून जाते. त्याच वेळी, आफ्टर शेव लोशनमध्ये अल्कोहोल असते, यामुळे जंतू नष्ट होऊ शकतात परंतु यामुळे चेहरा कोरडा व निर्जीव होतो. या कारणास्तव, आपण दाढीनंतर आफ्टर शेव्ह लोशन लावत असल्यास मॉइश्चरायझिंग क्रीम जरूर वापरा. असे केल्याने चेहर्‍यावरील कोरडेपणा दूर होईल.