home page top 1

‘ती’ महिला पोलीस कर्मचारी ३५ टक्के भाजली

अहमदनगर पोलिसनामा ऑनलाईन

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही महिला पोलीस कर्मचारी ३०-३५ टक्के भाजली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

सोनाली जाधव असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोनाली यांनी आत्महत्येचा प्रयत्न कौटुंबिक वादातून केल्याची माहिती समोर आली असून , पोलीस वसाहतीमधील आपल्या राहत्या घरातच त्यांनी हा प्रयत्न केला. त्यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटून घेतले, यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.

शनिवारी रात्री ही घटना घडली असून त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु असून त्या ३०-३५ टक्के भाजल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सोनाली या गेल्या दोन वर्षांपासून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरु असून त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांचा जबाब घेतला जाणार आहे.

Loading...
You might also like