कॉलसेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने युगांडातून बोलवून लावले ‘वाम’ मार्गाला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कॉल सेंटरमध्ये Call Center नोकरी लावण्याच्या बहाण्याने युगांडातून Uganda तरुणीला बोलावून तिला पुण्यात वेश्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी Sangvi Police एका प्रॉल्सी नावाच्या महिलेवर गुन्हा Crime दाखल केला आहे.

याबाबत पिडित तरुणीने सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
मुळची युगांडा Uganda येथील रहिवासी सध्या भारतात India राहणार्‍या प्रॉल्सी हिने या पिडित मुलीला भारतातून जानेवारी २०२० मध्ये फोन करुन कॉल सेंटरमध्ये नोकरी Jobs लावण्याचे आमिष दाखविले.
त्यानुसार ती २५ जानेवारी २० रोजी मुंबई विमानतळावर Mumbai Airport आली.
तेथे तिला घेण्यासाठी एका व्यक्ती आली होती.
ही व्यक्ती तिला घेऊन सांगवीत प्रॉल्सीकडे आणले.
तेथे प्रॉल्सी सोबत या पिडित तरुणीची भेट झाली.
तिने या तरुणीचा पासपोर्ट काढून घेतला.
त्यानंतर तिने पिडित तरुणीला सांगितले की, तुला मी सांगेल, त्याप्रमाणे काम करावे लागेल.
अन्यथा मी तुझा पासपोर्ट Passport तुला परत देणार नाही.
प्रॉल्सी हिने तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

कोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू

Ajit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती