एका छोटया चुकीमुळं ‘ही’ महिला बनली ‘करोडपती’ !

मिशिगन(अमेरिका) : वृत्तसंस्था – एका चुकीची किंमत मोठी मोजावी लागते असे म्हटले जाते. मात्र एक महिलेच्या बाबतीत हे उलटे घडले आहे. एका चुकीने महिलेला करोडपती बनवले आहे. हा प्रकार अमेरिकेतील मिशिगन येथे राहणाऱ्या एंटोनेट ओस्ले या महिलेच्या बाबतीत घडला आहे.

एंटोनेट ओस्लेने केलेल्या एका चुकीमुळे ती आज करोडपती झाली आहे. एंटोनेट ने केलेल्या चुकीमुळे तिचे आयुष्य बदलून गेले आहे. तिला लॉटरी काढायला आवडते. लॉटरीमध्ये तिने अनेकवेळा पैसे गमावले आहेत. मुलाच्या जन्मदिवशी ती लॉटरीमध्ये पैसे गुंतवते. मात्र प्रत्येक वेळी तिच्या नशिबी निराशा येत होती. मात्र, यावेळी तिला नशिबाने साथ दिली आणि तिने केलेल्या एका चुकीची किंमत तिला मिळाली आहे. यावेळी तिने आपल्या मुलाची जन्म तारीख चुकीची सांगितली आणि तिला लॉटरी लागली.

लॉटरीचे परिणाम बघत असताना तिच्या मनामध्ये आपल्याला लॉटरी का लागत नाही असा विचार आला. मात्र, त्याचवेळी लॉटरीची घोषणा झाली आणि तिला लॉटरी लागली. लॉटरी लागल्याचे समजताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने एका बहुचर्चीत लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. तिला एक लाख रुपयांची लॉटरी लागली.

तिच्या मुलाची जन्म तारीख ८ असून तिने चुकून १ नंबरच्या अंकावर पैसे लावले होते. या चुकीने तिला लखपती बनवले आहे. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर आपण खूप खुष आहोत. याच पैशातून एक घर खरेदी करण्याचा मानस असल्याचे तिने सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like