`ती’ महिला पोलीस होणार `तो’

बीडः (माजलगाव) : पोलीसनामा आॅनलाईन

मागील काही दिवासापूर्वी बीड पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी ललिता साळवे या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांनी चक्क लिंग बदलासाठी अर्ज केला होता. त्यामुळे बीड पोलिसांसमोर एक वेगळाच प्रसंग निर्माण झाला होता. शेवटी ललिता साळवे यांच्या प्रदिर्घ लढ्याला आता यश आलं आहे. त्यांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी केलेल्या मागणीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ती महिला कर्मचारी आता तो होणार आहे.

महिला पोलीस कर्मचारी ललिता साळवे या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून, पोलिस महासंचालकांच्या आदेशा नुसार जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर यांनी ललिता साळवे हिला लिंगबद्दल करण्याच्या परवानगीचे पञ दिले आहे. पोलिस महासंचालकांच्या या आदेशामुळे ललिता साळवेचा लिंगबद्दल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लिंगबदलाची शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ललिता साळवे ललितकुमार होणार आहे. गृह विभागाने मागिल महिन्यापूर्वी तामिळनाडु राज्यातील एका तृतिय पंथीयाबाबतीत घेतलेल्‍या निर्णयाच्या आधारे ललिता साळवेला दिलासा देणारा निर्णय दिला आहे.

याबात सविस्तर वृत्त असे की, बीड पोलीस दलात कार्यरत असलेल्या ललिता साळवे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शरिरात होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी तिने पोलिस खात्याकडे रितसर परवानगी अर्ज देखील केला होता. माञ, ललिता ही भरतीच्या वेळी महिला म्हणून भरती झाली असून लिंगबदल केल्यास पुरुष झाल्याने तिच्या नोकरीवर गदा येण्याची शक्‍यता होती. त्‍यामुळे ललिता साळवेने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. अब्बास नक्वी यांच्या मार्फत एक याचिका दाखल केली होती.

या प्रकरणावर सुनावणी करताना शरिरात बदल करण्याचा नैसर्गिक अधिकार आसल्याचे म्हणत न्यायालयाने तिच्या लिंगबदलाला परवानगी दिली होती. माञ, गृहविभागात ही पहिलीच केस आसल्याने तांञिक अडचणी निर्माण झाल्या होत्‍या. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आसल्याने या बाबत सहानभुती पुर्वक विचार केला जाईल असे म्‍हटले होते. दरम्‍यान, लिंगबलाच्या दिलासा देणाऱ्या निर्णयानंतर ललिता साळवे आपल्या लिंगबदल शस्ञक्रियेसाठी तात्काळ मुंबईला रवाना झाल्या आहेत.