भीषण आगीत उसतोड कामगारांच्या झोपड्या जळून खाक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – वरखेडी गावाजवळील आदिवासी वस्तीतील उसतोड कामगारांच्या झोपडीला आग लागून झोपड्या जळाल्याची घटना घडली आहे. या आगीत कालु रावसिंग भिल (27) दिलीप रवसिंग भिल (33, दोघेही रा.वरखेडे) या दोघे भावंडाच्या झोपड्या जळुन खाक झाल्या आहेत.

हेही वाचा – युतीचा प्रचार ठरला ; ‘या’ शहरात फोडणार प्रचाराचा नारळ 

याबाबत मिळालेली माहिती अशी, सायंकाळी साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान बेडसे यांचे शेतात वास्तव्यास असलेल्या आदिवासी पाड्यातील झोपडीत पेटता दिवा उंदराच्या धक्क्यामुळे पडुन झोपडीला आग लागली. यात दोघेही भावंडाच्या झोपड्या पुर्ण जळुन खाक झाल्या आहेत. आगीत संसार उपयोगी साहित्य जळुन खाक झाले असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यात सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच नगरसेवक संजय अहिरे यांनी मनपा अग्निशामक विभागाला घटनेची माहिती दिली. घटनास्थळी मनपाचे दोन बंब दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी झोपडीतील आगीवर पाणी मारा करुन आग अटोक्यात आणली.

You might also like