Sheer Qorma Trailer : आयुष्माननंतर आता स्वरा भास्करनं आणली ‘समलैंगिक’ नात्यांची इमोशनल ‘कहाणी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात सेक्शन 377 रद्द करण्यात आले असले तरी समलैंगिकतेच्या नात्यावर लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. आयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधान सिनेमा प्रदर्शित होऊन काही दिवस झाले, प्रेक्षकांकडून या सिनेमाला बरेच प्रेम मिळाले. त्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिव्या दत्त आपला नवा सिनेमा शीर कोरमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला.

काय आहे कथा –
आयुष्यमानच्या सिनेमाच्या बरोबर उलट शीर कोरमा या सिनेमात दोन तरुणी सायरा आणि सितारा (दिव्या दत्त आणि स्वरा भास्कर) एकमेकींवर प्रेम करताना दिसल्या आहेत. सायराची आई (शबाना आझमी) या नात्याला गुन्हा मानते आणि हे नाते स्वीकारण्यास तयार नसते. तर सायराचा भाऊ आणि वहिणी त्यांच्यासोबत उभे राहतात.

आता या सिनेमात या दोघींचे नाते जुळते का आणि सायराची आई त्यांच्या नात्याला सहमती देते का हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल. सिनेमात दिव्या दत्त एक कुर्ता पायजमा आणि जॅकेट यासारखे कपडे घालणारी आहे तर स्वरा भास्कर मुलीसारखे राहणारी पसंत करणारी सुंदर सूटसह झुमके घालणारी आहे. ही कथा दोन मुस्लीम तरुणींची आहे.

सिनेमाचा ट्रेलर थोडा स्लो आहे परंतु कथा अत्यंत भावनिक आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे असे दिसते. सिनेमात भावनेबरोबर या दोघी अभिनेत्रींचा जबरदस्त परफॉर्मन्स देखील असणार आहे असे ट्रेलरवरुन वाटते.

शीर कोरमा या सिनेमाचे दिग्दर्शन फराज आरिप अंसारी यांनी केले आहे. ही कथा देखील त्यांनीच लिहिली आहे. हा सिनेमा सिनेमा गृहांऐवजी फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

 

 

You might also like