Sheezhan Khan | ‘मी निर्दोष आहे आणि…’; तुनिषा शर्मा प्रकरणावर आरोपी शीझान खानची प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Sheezhan Khan) मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तुनिषाच्या आईने अभिनेता शीझान खानवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या तक्रारीवरून तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात अभिनेता शीझान खानला (Sheezhan Khan) अटक करण्यात आली. या प्रकरणी न्यायायलाने शीझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी मुख्य आरोपी शीझान खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला शीझान खान?
शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितले कि, शीझान निर्दोष आहे. “वसई कोर्टात हजर करण्यापूर्वी शीझान खाननं आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी शीझान म्हणाला कि, “माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी निर्दोष आहे. ‘सत्यमेव जयते..!”

शीझान जामिनासाठी अर्ज करणार
शीझानचे वकील मिश्रा यांनी सांगितले कि, शीझान (Sheezhan Khan) सोमवारी कोर्टात या खटल्याच्या संदर्भात पहिला जामीन अर्ज दाखल करणार आहे. “आम्ही खटल्याशी संबंधित काही प्रमाणित कागदपत्रांसाठी अर्ज केला आहे. ती मिळाली की, जामीन अर्ज दाखल करणार आहोत.”

काय आहे प्रकरण ?
तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी अली बाबा दास्तान-ए-काबुल या टीव्ही शोच्या सेटवर गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. यानंतर 25 डिसेंबर रोजी पोलिसांनी शीजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तुनिषाची आई वनिता यांनी शीझान विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

Web Title :-  Sheezhan Khan | tunisha sharma suicide case sheezan khan says have faith in judiciary i am innocent read details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ या विधानावरून संभाजीराजे छत्रपतींनी अजित पवारांना ठणकावलं, म्हणाले…

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचे बारामतीत पडसाद; बारामतीतील घरासमोर त्यांचा पुतळा जाळून व्यक्त केला निषेध

Bro Gref Recruitment | पुण्यात ५६७ जागांसाठी लवकरच भरती; १० वी ते ग्रॅज्युएट पास करू शकणार अर्ज