अभिनेत्री शेफाली जरीवाला लवकरच होणार आई !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बिग बॉस 13 फेम अभिनेत्री डान्सर शेफाली जरीवाला हिनं अलीकडेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर लोकांनी अंदाज लावायला सुरुवात केली की, शेफाली प्रेग्नंट आहे आणि लवकरच ती आई होणार आहे. परंतु असंच काहीचं नव्हतं. लोकांचा तो अंदाज खोटा निघाला होता. परंतु ही गोष्ट समोर आली आहे की, शेफाली लवकरच आई होणार आहे. शेफाली आणि पती पराग त्यागी यांनी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीत शेफालीनं या गोष्टीचा खुलासा केला आहे.

शेफाली म्हणाली, “मी 10-11 वर्षांची असतानाच मला अॅडॉप्शन या शब्दाचा अर्थ कळाला होता. तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं मी कधी ना कधी मूल दत्तक घेईन.”

फॅमिलीला मनवणं अवघड

शेफाली पुढं म्हणाली, “पराग यासाठी अजिबात तयार नव्हता आणि फॅमिलीला समजावणंही अवघड होतं. माझे वडिल म्हणाले होते की, आधी तुझं मूल येऊ दे मग दत्तक घे. अॅडॉप्शन खूप मोठा निर्णय आहे. परंतु जेव्हा मी परागला समजावून सांगितलं की, ज्या मुलाला त्याच्या पालकांनी स्विकारलं नाही अशा मुलाला मला चांगलं आयुष्य द्यायचं आहे तेव्हा परागला ते लक्षात आलं आणि तो माझ्या सोबत आहे.”

अॅडॉप्शनला लागतो एवढा कालावधी

शेफाली पुढं म्हणाली, “भारतात अॅडॉप्शनची प्रोसेस एवढी सोपी नाहीये. आम्ही काही प्रोसेस केली होती. परंतु लॉकडाऊनमुळं ही प्रोसेस थांबली आहे. भारतात हे सोपं नाहीये. 2-3 वर्ष लागतात अॅडॉप्शनसाठी.”