भारताकडून खेळणारी दुसरी सर्वात कमी वयाची क्रिकेटर बनली शेफाली वर्मा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्न असते. मात्र अनेक खेळाडूंचे स्वप्न लवकर पूर्ण होत नाही तर काही खेळाडूंचे हे स्वप्न त्यांच्या मेहनतीच्या बळावर लवकर पूर्ण होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी पदार्पण करणाऱ्या शेफाली वर्मा या महिला क्रिकेट खेळाडूचे देखील कमी वयात भारतीय संघासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Image result for शेफाली वर्मा

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शेफाली वर्मा हिने भारतीय महिला संघात पदार्पण केले आहे. त्याचबरोबर ती इतक्या कमी वयात भारतीय संघासाठी खेळणारी दुसरी महिला खेळाडू ठरली आहे.

Image result for शेफाली वर्मा

सुरतमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ज्यावेळी तिला टोपी देण्यात आली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद न मोजण्यासारखा होता. सर्व खेळाडूंनी तिचे अभिनंदन करण्याबरोबरच तिला भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

Image result for शेफाली वर्मा

शेफाली वर्मा हिने वयाच्या 15 वर्ष आणि 239 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले आहे तर गार्गी बॅनर्जी यांनी 1978 मध्ये वयाच्या 14 वर्ष आणि 165 व्या दिवशी भारतीय संघासाठी पदार्पण केले होते.

Related image

सचिन याच्या शेवटच्या सामन्यानंतर मिळाली प्रेरणा-

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना हा हरियाणामधील लाहलीमध्ये खेळला होता. त्यावेळी 10 वर्षांची शेफाली हि प्रेक्षकांमध्ये बसली होती. त्यावेळी तिने भारतीय संघासाठी खेळण्याचे निश्चित केले. त्यानंतर आज पाच वर्षांनी ती भारतीय महिला संघासाठी खेळत आहे. एका मुलाखतीत तिने आपल्या क्रिकेटमधील प्रवासाविषयी माहिती दिली होती. सचिन तेंडुलकरला पाहूनच मला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाल्याचे तिने या मुलाखतीत म्हटले होते.

Visit : policenama.com