TikTok वर शेफाली जरीवालाची दमदार ‘एन्ट्री’, आसिम रियाजच्या गाण्यावर बनवला पहिला ‘व्हिडीओ’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस 13 ची एक्स स्पर्धक शेफाली जरीवाला सध्या चर्चेत आली आहे. याचं कारणही खास आहे. शेफाली जरीवालानं नुकताच टिकटॉक डेब्यू केला आहे. खास बात अशी की, आसिम रियाजच्या गाण्यावर डान्स करत तिनं टिकटॉकवर एन्ट्री घेतली आहे. आता आसिम रियाज आणि शेफाली जरीवाला यांच्यात किती दुश्मनी आहे हे चाहत्यांना माहितीच आहे.

जेव्हा आसिम आणि शेफाली बिग बॉस 13 मध्ये होते. तेव्हाच त्यांच्यात दुश्मनी झाली होती. जी शेवटपर्यंत तशीच राहिली होती. शो संपल्यानंतर एकदाही एकमेकांना भेटणार अस दोघंही शोमध्ये म्हणत होते. शो संपल्यानंतरही दोघांचा कोणता फोटो समोर आला नाही. त्यामुळं आता तिनं आसिम रियाजच्या गाण्यावर डान्स करत टिकटॉक व्हिडीओ तयार केल्यानं सारेच अवाक् झाले आहेत.

शेफालीनं एक टिकटॉक व्हिडीओ तयार केला आहे. यात डी डान्स करताना दिसत आहे. तिनं आपल्या डान्सचा हा व्हिडीओ आणि तिच्या इंस्टावरून शेअर केला आहे. मेरे अंगने में या आसिम रियाजच्या रिक्रिएटेड गाण्यावर ती थिरकताना दिसत आहे. तिनं हा व्हिडीओ विनय सप्रु आणि राधिका राव यांना समर्पित केला आहे ज्यांनी मेरे अंगने में या व्हिडीओ साँग डायरेक्शन केलं आहे. शेफालीचा डेब्यू ट्रॅक कांटा लगा देखील त्यांनीच डायरेक्ट केला होता. या गाण्यानंतर ती स्टार झाली होती.

शेफाली व्हिडीओ शेअर करताना कुठेच आसिम रियाज उल्लेख केलेला नाही. तिनं लिहिलं की, “मेरे अंगने में खूपच शानदार ट्रॅक आहे. मी माझा टिकटॉक व्हिडीओ विनय आणि राधिका यांना समर्पित करते. मी जे काही आहे ते तुमच्यामुळंच आहे. या माध्यमातून मी तुमचे आभार मानत आहे. आशा करते तुम्हाला हे आवडेल.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like