शेगाव : संत नगरीत भाविकांसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्याची मागणी

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन

श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेल्या शेगांव या तीर्थक्षेत्रा पर्यंत भाविकांसाठी दररोज मुंबई येथून स्पेशल ट्रेन सुरू करण्याची मागणी गृहराज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7bce8ee-c324-11e8-8a16-c3542747306d’]

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते. याठिकाणी श्री संत गजानन महाराज यांची समाधी आहे. याचबरोबर आनंद सागर हे उत्कृष्ठ असे उद्यानही आहे. याठिकाणी समाधी दर्शन व आनंद सागर उद्यानाला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो लोक संपुर्ण महाराष्ट्रातुन तसेच भारतातुन येत असतात. या भाविक भक्तांना सोईचे व्हावे यासाठी मुंबई येथून शेगांवपर्यंत विशेष रेल्वे गाडी सुरु करावी, अशी या भागातील जनतेची मागणी होती. या मागणीचा विचार करत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केंद्रिय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मुंबई ते शेगांव अशी विशेष रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bde80ab5-c324-11e8-b798-135c20d3bbbd’]

विशेष म्हणजे शेगांव येथे रेल्वे जंक्शन नसल्यामुळे इंजिन बदलविण्यासाठी अकोला जंक्शनचा उपयोग होईल म्हणुन ती गाडी मुंबई ते अकोला अशी करण्यात यावी, आणि रेल्वेगाडीला श्री गजानन महाराज एक्सप्रेस असे नाव देण्यात यावे, असेही या मागणीत नमूद केले आहे.

पुणेकरांचा रोष पाहून गिरीश महाजनांनी घेतला काढता पाय